Sharad Pawar : महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी भरसभेत सांगितली इच्छा, भरसभेत नेमकं काय म्हणाले पवार?

Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे. मात्र अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगितलेला नाही.
मात्र सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत दिले जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले आहे. Sharad Pawar
निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने आता असा प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बॅटिंग करतायत का? महिला मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. Sharad Pawar
शरद पवार यांची शिरुर तालुक्यातल्या वडगाव रसाई इथं प्रचारसभा झाली. या सभेत ते म्हणाले की,“राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला.
आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे.” शरद पवारांच्या या विधानामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.