Shirur : अशोक पवारांच्या सभेतून ज्येष्ठ शेतकऱ्याला बाहेर काढले! हेच स्व. रावसाहेब दादांचे संस्कार आहेत का? शेतकऱ्याचा सवाल, घटनेचा व्हिडीओ व्हायरल..


Shirur  शिरूर – आमदार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बंद पाडण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या प्रगतशील शेतकरी आणि ज्येष्ठ नेते अरविंद ढमढेरे यांना आमदार अशोक पवार यांनी पोलिस बळाचा वापर करत बाहेर काढल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यापासून शेतकरी विस्थापित झाले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचा मोठा प्रश्न शिरुर तालुक्यात निर्माण झाले आहे. कामगार व शेतकरी आंदोलनानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत या प्रखर विरोध आ.अशोक पवार यांना सहन करावा लागत आहे. अशातच तळेगाव ढमढरे (ता.शिरुर ) प्रचारसभेत सभेत उसाचे टिपरू दाखवून आपला शेतकऱ्याने विरोध सुरू केला आहे. या शेतकऱ्याला सभेतून सभेतून बाहेर काढल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या शेतकऱ्याने आमदार अशोक पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप सामान्य जनतेतून केला जात आहे. आमदार अशोक पवार भ्रष्टाचारी – सभेत ज्येष्ठ नेते व शेतकरी अरविंद ढमढेरे यांना सभेतून बाहेर काढल्यावर त्यांनी अशोक पवार यांना भ्रष्टाचारी म्हणत आपला निषेध व्यक्त केला.

व्हिडीओ झाला व्हायरल….

लोकशाहीत प्रश्न विचारणे अवघड झाले?

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे अरविंद ढमढेरे यांच्या विरोधाला सभेत उत्तर न देता पोलिसांच्या माध्यमातून त्यांना सभेच्या बाहेर काढणे, हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याचे अनेकांचे मत आहे. एक शेतकरी नेत्याला अशाप्रकारे अपमानित करणे हे सत्ता हाती असलेल्या नेत्याची अहंकारी वृत्ती दर्शवते, असे नागरिकांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून निव्वळ सत्तेचा वापर करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये प्रकट झाली आहे.

रावसाहेब पवार असते तर…

ढमढेरे यांच्या निषेधानंतर, अनेकांनी स्व. रावसाहेब पवार यांची आठवण काढली. त्यांचे संस्कार आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी ही अशोक पवार यांच्या वागण्यात मात्र दिसून येत नाही, अशी टीका करण्यात येत आहे. स्व. रावसाहेब पवार असते, तर त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेतला असता, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ज्येष्ठांचा सन्मान आणि शेतकऱ्यांशी नीट वागण्याची आवश्यकता नेत्यांना समजली पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. हेच स्व.रावसाहेब पवार यांनी अशोक पवारांवर संस्कार केले की सत्तेच्या अहंकाराने अशोक पवार हे शेतकऱ्यांशी वाईट व चुकीचे तसेच असंस्कृत पणे वागत आहे.निदान वडिलांच्या संस्काराची तरी जन ठेवायला हवी असे मत नागरिक व्यक्त करत आहे.

आमदार अशोक पवार यांची हुकुमशाही …

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेत्यांनी सामोरे जाण्याची गरज असताना, त्यांचा आवाज दाबणे आणि निषेध करणाऱ्यांना सभेतून बाहेर काढणे हा लोकशाहीला धक्का आहे. अशोक पवारांच्या सत्ताधारित वागणुकीमुळे सामान्य मतदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ही हुकुमशाही वृत्ती असून अशा वृत्तीमुळे लोकशाहीची हत्या होत आहे. अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवायला हवी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणे,सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे.आमदार आणि संचालक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी आणि भान बाळगायला हवे. सत्तेच्या जोरावर प्रश्न विचारणाऱ्यांना दडपण्याचे प्रयत्न किती काळ चालणार? शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेते संवेदनशील होतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!