Pune : ज्या व्यक्तीला फोनवर शहाजीबापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, त्यालाच खेडमध्ये ५ कोटींसह पकडले, राजकारणात एकच खळबळ…

Pune : राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता.
संध्याकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहनातील रोख रक्कम जप्त केली. Pune
खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त करण्यात आलेली रक्कम ज्या गाडीमधे दडवण्यात आली होती. त्या गाडीमध्ये असलेल्या या चार व्यक्ती आहेत. या चार जणा़ंची नावे खेड शिवापूर पोलीस चौकीच्या स्टेशन डायरीमधे नोंद करण्यात आली आहेत.
यातील रफिक नदाफ नावाच्या व्यक्तीने शहाजीबापू पाटील यांना गुहावटीला असताना फोन केला होता. त्याच्याशी बोलतानाच शहाजी बापूंनी ‘काय झाडी काय डोंगार’ असा उल्लेख केला होता. तर यातील सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे.