Pune Crime : पतीचे भयंकर कृत्य! इंजिनिअर पत्नीवर मित्रांना करायला लावले अत्याचार, व्हिडिओ काढला अन्…!! पुण्यातील घटनेने सगळेच हादरले…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सॉफ्टवेअर इंजिनअर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेवर पतीसह चौघांनी अत्याराच केल्याची खळबळजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
त्यानंतर आपल्याच मित्रांना तिच्यावर वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार करायला लावले. याशिवाय त्याचं शूटिंगही केलं. यानंतर पती तिला ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ३० वर्षीय महिलेनं पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पतीने सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत मित्रांसोबत मिळून अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. महिला आणि तिचा पतीसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. Pune Crime
पतीने जबरदस्तीने तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले. पतीने त्याच्या मित्रांना पत्नीसोबत संबंध ठेवायला सांगितले. वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार करत त्याचे शूटिंगही केले.
या अत्याचाराचे व्हिडीओ तिला दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा अनैसर्गिक संबंधाला तिने नकार दिला तेव्हा पतीने तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.