ब्रेकिंग! मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा, स्थगिती उठवली…!
मुंबई : अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. १११ मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा नियुक्ती बेकायदा व मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
यामुळे १११ मराठा उमेदवारांचे आता नियुक्तीवरील आक्षेप दूर झाले आहेत. या निर्णयानंतर ही नियुक्ती आता कायम राहणार आहे. यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१९ सालच्या अभियांत्रिकी सेवाभरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना हा मोठा दिलासा देणारा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, मराठा उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून दिलेली नियुक्ती बेकायदा ठरवण्याच्या ‘मॅट’च्या निर्णयाला प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
यामुळे या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.