गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गावकऱ्यांचा मोठा निर्णय…!

नाशिक : राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी आत्महत्या देखील होत आहेत. सध्या भाजीपाला सध्या खूपच स्वस्त झाला आहे. कितीही चांगली शेती करा, चांगलं पिक आना पण त्या मालालाच भाव मिळत नाही आहे.

असे असताना यामुळे नाराज झालेल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले आहे. यामुळे अधिकारीही कोड्यात पडले आहेत. नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावच गावकऱ्यांनी विकायला काढलं आहे.
याचा गावकऱ्यांनी ठराव करून तो शासनाकडे पाठवणार आहेत. यामुळे याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगू लागली आहे. तसेच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. याच्याआधी गावचा विकास होत नसल्याने राज्यातील अनेक गावांनी कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्यास परवानगी द्या असे ठराव केले होते.

त्यानंतर आता फुलेमाळवाडी विकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याने फुलेमाळवाडी गाव चर्चेत आले आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.