Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये भाजप सुसाट, काँग्रेसचे होणार मोठं नुकसान, नेमकं गणित कुठं बिघडलं?

Jammu Kashmir : लोकसभा निवडणुकीचे समोर आल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्वबळावर बहुमत मिळवण्यात देखील पक्ष अपयशी ठरलाय. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत हे वर्ष पक्षासाठी सर्वात वाईट ठरले आहे.

जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या निवडणुकीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांची परीक्षा आहेच शिवाय भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय ताकदीची सुद्धा परीक्षा आहे.


परिसीमन झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या कार्यवाहीनंतर जम्मू प्रांतात ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ मतदारसंघ तयार झाले आहेत.
याआधी २०१४ मध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी जम्मू मध्ये ३७ जागा होत्या यातील २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावरून लक्षात येते की जम्मूमध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे. या निवडणुकीत सुद्धा भाजपचा सर्वाधिक भर जम्मूवरच आहे. काश्मीर मध्ये भाजपने ४७ पैकी फक्त १९ जागांवर उमेदवार दिले आहेत. जम्मूमध्ये जर आघाडी मिळाली तर राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरेल अशी अपेक्षा भाजप नेत्यांना आहे.
निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात भाजप येथे कमजोर दिसत होता. प्रॉपर्टी टॅक्स आणि टोल प्लाझा या मुद्द्यांवर लोकांमध्ये नाराजीची भावना होती. ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर मोठे फायदे होतील असे सांगण्यात आले होते. विशेष करून रोजगार आणि गुंतवणुकीत वाढ होईल असे सांगण्यात आले होते. Jammu Kashmir
परंतु तसे होताना काही दिसले नाही असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. तिकीट वाटपात सुद्धा भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. परंतु निवडणूक प्रचाराच्या सध्याच्या काळात असे दिसत आहे की जम्मूमध्ये काँग्रेस कमकुवत होत चालली आहे तर भाजपने जोरदार प्रचार करत आपली स्थिती आणखी बळकट केली आहे.
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरनसमध्ये मैत्रीपूर्ण लढत…
दोन्ही पक्षात आघाडी झाल्यानंतर काँग्रेसला ज्या ३२ जागा मिळाल्या आहेत त्यातील २९ जागा जम्मूमध्ये आहेत. या जागांवर काँग्रेस निवडणूक लढत आहे. यातील चार जागा अशा आहेत जिथे नॅशनल कॉन्फरन्सचेही उमेदवार रिंगणात आहेत. काश्मीरमध्ये ९ जागा अशा आहेत जिथे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरनस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
उमेदवार निवडीत चूक..
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या असे म्हणणे आहे की पक्षाने उमेदवारांची निवड करताना जातीगत समीकरणात गडडब झाली आहे. नंतर या चुका पक्षाच्या लक्षात आल्या. एमके भारद्वाज आणि भानू महाजन यांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले.
तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी काश्मिरच्या तारिक अहमद कर्रा यांना देण्यात आली. जम्मूमधून ताराचंद आणि रमन भल्ला या दोघांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. अशा पद्धतीने पक्षाने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.
