Akshay Shinde Encounter : आता मी कोणालाही सोडणार नाही!!! पोलीस कर्मचारी संजय शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट…
Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.
या घटनांमध्ये संजय शिंदे या पोलिस अधिकाऱ्याने एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार, अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला करताना, “कुणालाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. संजय शिंदे यांच्या एफआयआरमध्ये दिलेला जबाब एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे.
त्यांनी उल्लेख केला आहे की, अक्षयने हवालदार महेश तावडे यांच्या दिशेने दोन राऊंड गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना खात्री होती की अक्षय आणखी गोळ्या झाडेल. Akshay Shinde Encounter
संजय शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी सकाळी ५:३० वाजता आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला ताब्यात घेतले. आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो, त्यावेळी मी व्हॅनमध्ये पुढे बसलो होतो, आणि अक्षय, सपोनि निलेश मोरे, व दोन अंमलदार मागे बसले होते.
ते पुढे म्हणाले, शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आल्यावर, निलेश मोरेने मला फोन केला यावेळी आरोपी अक्षय रागाने ‘तुम्ही मला पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात?’ असे विचारले, तसेच शिवीगाळ केली आहे.