Pune : पुण्यात भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, आता शहरातील समीकरण बदलणार…


Pune : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. निवडणुका तोंडावर असताना नेते पक्ष सोडून जात असल्याने भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

भाजप नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सव सुरू असताना एका गणपती मंडळामध्ये त्यांनी आगामी काळातील निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले होते. Pune

त्यावेळीच बापूसाहेब पठारे यांनी तुतारीला मतदान करा असे आवाहन केले होते. अखेर गणपती विसर्जनादिवशी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी पवारांच्या पक्षाची वाट पकडली आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

कोण आहेत बापूसाहेब पठारे?

विधानसभा निवडणुक २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बापूसाहेब पठारे निवडून आलं आहे. त्यानंतर २०१४ साली त्यांचा पराभव झाला होता. भाजपचे जगदीश मुळीक विजयी झाले होते. निवडणुकीवेळी पक्षात झालेल्या गटबाजीमुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र २०१९ मध्ये भाजपकडून मुळीक यांनाचा उमेदवारी देण्यात आली. पण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी विजय मिळवला होता. टिंगरे अजित पवार गटात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!