Crime News : आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक प्रकार, आरोपीला अटक…

Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आईच्या प्रियकरानेच चौदा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पण तिने दुर्लक्ष केलं म्हणून मुलीने शाळेतील शिक्षिकेच्या कानावर ही बाब टाकली अन् नराधमाचे बिंग फुटले.
पंकज धोत्रे असं त्याचे नाव असून रावेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
रक्षाबंधन दिवशी पंकज धोत्रे त्या मुलीच्या घरीच होता. मुलीची आई कामावर तर भाऊ शाळेत गेला अन् धोत्रेने याचा फायदा घेतला. पंकज धोत्रेने मुलीला जवळ घेत तिच्याशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. मात्र यातून सुटका करून घेण्यासाठी ती जोराने ओरडू लागली. मग धोत्रेने तिला सोडून दिलं. Crime News
वर्षभरापूर्वीही धोत्रेने असेच कृत्य केले होते. मात्र मुलीने आईला सांगूनही तिने तुला असा भास झाला असेल असं म्हणत दुर्लक्ष केले. आई यावेळीही पंकज धोत्रेचीच बाजू घेणार असे त्या मुलीला वाटले, म्हणून तिने शाळेतील शिक्षिकेला घडला प्रकार सांगितला.
त्यानंतर शाळेत पोलिसांना बोलविण्यात आले. रावेत पोलिसांत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पंकज धोत्रेला बेड्याही ठोकण्यात आल्यात. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली आहे.