काळजी घ्या! सध्या सगळीकडेच ताप खोकला, अंगदुखीची सात, वातावरण बिघडले…!

पुणे : सध्या सगळीकडेच नव्या व्हायरसची साथ पसरली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे जाणवत आहेत. ताप आणि खोकल्याच्या घटना वाढण्यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे.
दरम्यान, हा आजार जीवघेणा नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. तापमानामध्ये होणारे बदल प्रदूषण आणि प्रतिकारक शक्तीची कमतरता या आजाराला पोषक ठरते आहे. रुग्णाला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्याचा कालावधी लागत आहे.
महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने दिली आहे. या साथीने बेजार झालेले अनेक रुग्ण घराघरामध्ये आढळत आहेत. यासाठी सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा घराबाहेर पडताना मास्क वापरा. खोकताना आणि शिंकताना तोंड झाका. हात धुतल्याशिवाय डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका. पुणे जिल्ह्यात देखील याची सात पसरली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या रात्रीचा गारवा आणि दिवसा ऊस असे चित्र आहे. यामुळे याचा आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे.