Manoj Jarange Patil : मोठी बातमी! आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय…


Manoj Jarange Patil : मनोज जरांगे दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. अशात मनोज जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी पुढचे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचे म्हटलं आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचेमनोज जरांगे यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे.

त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे.

मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसं कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असे जरांगे म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!