Badlapur : बदलापूर अत्याचार प्रकरणात वेगळीच माहिती समोर, आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले, माझ्या मुलाला..
Badlapur : बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता अक्षय शिंदे याच्या आईवडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा दावा केला. Badlapur
अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामध्ये अक्षयला फसवलं जात असल्याचंही सांगितले आहे.
अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.