Pune : तरुणांसाठी मोठी संधी! पुणे महापालिकेत नोकरीची संधी, ६८२ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या…


Pune : राज्यातील युवकांना पुणेकर होण्याची संधी मिळाली आहे. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शेकडो जागांची भरती पुणे महानगरपालिकेने काढली आहे. या भरतीसाठी लगेच अर्ज करावा लागणार आहे.

पुणे महानगर पालिकेत तब्बल ६८२ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. याबाबत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. विविध पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी १९ ऑगस्टपर्यंत ऑलनाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुदत अत्यल्प असल्याने उमदेवारांना तातडीने अर्ज करावे लागणार आहेत.

पुणे महापालिकेत विविध ६८२ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. Pune

पुणे महानगर पालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून नुकतंच पालिकेनं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, इच्छुकांना अर्ज लवकरात लवकर करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत काही दिवसच शिल्लक राहिलीये.

त्यामुळे १९ ऑगस्ट पूर्वी पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे. पुण्यात नोकरीची संधी पाहिजे असेल तर उमेदवारांना तातडीनं अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच याबाबत अधिक माहितीही महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!