Gold Price : चांदी झाली स्वस्त, पण सोने महागले, जाणून घ्या आजचा भाव…

Gold Price : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव सतत खाली घसरताना दिसत होते. दरांमध्ये सातत्याने सुरू असलेली घसरण आज थांबली आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात मंगळवारी (ता. १३) प्रति ग्रॅममागे ४८२ रुपयांची वाढ झाली. तर चांदी प्रति किलोमागे ५२६ रुपयांनी स्वस्त झाली. आज शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७०,३७२ रुपयांवर खुला झाला आहे. सोमवारी हा दर ६९,८९० रुपयांवर बंद झाला होता. चांदीचा दर प्रति किलो ८१,१२४ रुपयांवरुन ८०,५९८ रुपयांपर्यंत खाली आला आहे. Gold Price
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७०,३७२ रुपये, २२ कॅरेट ६४,४६१ रुपये, १८ कॅरेट ५२,७७९ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४१,१६८ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८०,५९८ रुपयांवर खुला झाला आहे.
चांदी घसरली…
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी ४२०० रुपयांनी उतरली होती. त्यानंतर 1600 रुपयांनी किंमती वधारल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला १२ ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे ६०० रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात त्यात पुन्हा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ८२,५०० रुपये आहे.