दादर सुटकेस हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती झाली उघड, बायकोचे मित्रासोबत अफेअर अन्…

मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री मृतदेह असलेली एक सुटकेस मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली, या नंतर ही सुटकेस घेऊन तुतारी एक्स्प्रेसने मुंबईबाहेर निघण्याच्या तयारीत असलेल्या प्रवीण चावडा आणि त्याचा साथीदार शिवजित सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
हे दोघेही मूकबधीर असल्याने पोलिसांना ही भाषा जाणणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन चौकशी करावी लागत आहे. विवाह बाहय संबंधातून ही हत्या घडल्याचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, प्राथमिक चौकशीनंतर या हत्याप्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. हत्या झालेला अर्शद अली सादिक अली शेख आणि आरोपी प्रवीण चावडा, शिवजित सिंग हे तिघेही मित्र मूकबधीर होते.
मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले.
यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. त्यानंतर जय आणि शिवजित सिंह यांनी सादिकचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये भरला. हा मृतदेह दोघांनी मिळून टॅक्सीत टाकला. त्यानंतर जय चावडा पायधुनीवरून बॅग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आला.
तिथून खोपोली लोकल पकडून तो दादरला उतरला. यानंतर जय चावडा ही बॅग घेऊन तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढत होता. त्यावेळी पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी त्याला हटकले असता त्याने बॅग उघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्या चौकशीतून जी माहिती समोर आली आहे त्यावरुन पोलिसांनी एक ट्रँगल थिअरी मांडली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. मात्र, त्याच्या पत्नीचे शिवजित सिंह याच्यासोबत विवाहबा संबंध होते.
रविवारी दारु प्यायला बसल्यानंतर अर्शदच्या बायकोचा विषय निघाला आणि शिवजित सिंग याच्याशी त्याचा वाद झाला. हाच वाद विकोपाला गेला. तर शेवटची शक्यता म्हणजे अर्शद शेख याच्याकडे जय चावडाचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील नाजूक क्षणांचे काही व्हीडिओ होते. हेच इंटिमेट व्हीडिओ दाखवून अर्शद शेख हा जय चावडला ब्लॅकमेल करत असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, यापैकी नक्की कोणती थिअरी घरी आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.