Sandeep Bhondve : आमदार अशोक पवार यांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा फलक उखडून टाकण्याचा संदिप भोंडवेचा इशारा! तीन महिन्यांपूर्वी भूमिपूजन केलेल्या कार्यक्रमावरून भाजपचा आक्षेप..!!
Sandeep Bhondve उरुळीकांचन: शिरुर -हवेली मतदारसंघातील हवेली तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या लोणीकंद ते डोंगरगाव तसेच डोंगरगाव ते वारघडे वस्ती या ६ कोटी ९८ लाख रूपये खर्चाच्या विकासकामांच्या उद्घाटनावरून पुणे नियोजन मंडळाचे सदस्य संदिप भोंडवे यांनी आमदार अशोक पवार यांना लक्ष केले असून अशोक पवार यांनी मंगळवार (ता. ६) ठेवलेल्या विकासकामांचा भूमिपूजनाचा फलक उखडून टाकण्याचा इशारा पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संदिप भोंडवे यांनी दिला आहे.
आमदार अशोक पवार यांनी डोंगरगाव- वरघडे वस्ती बकोरी ३ कोटी ७८ लाख तसेच लोणीकंड ते डोंगरगाव ३ कोटी २० लाख रुपये विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम ठेवला आहे. परंतु या कार्यक्रमाला भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे.
या कामाचे सुमारे तीन महिन्यांपूर्वी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे आमदार अशोक पवार कामाचे श्रेय घेण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
याबाबत संदिप भोंडवे यांनी व्हिडीओ जारी करुन आमदार अशोक यांनी भूमिपूजन कार्यक्रम घेतला तर कार्यक्रम फलक उखडून टाकण्याचा थेट इशारा आमदार अशोक पवार यांना दिला आहे. Sandeep Bhondve
दरम्यान शिरुर -हवेली मतदारसंघात अशा कामांचे श्रेय घेण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्याकडून चढाओढ लागली असून त्यांच्याकडून अनेक मुद्दांवर खोटे नेरेटिव्ह पसरविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने त्यांचे जनतेला दिशाभूल करणारे राजकारण समोर आणण्यासाठी मोहिम उघडणार असल्याचा इशारा पै. संदीप भोंडवे यांच्या वतीने देण्यात आला आहे.