Raj Thackeray : महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचे महत्वाचे आवाहन, म्हणाले, माझी हात जोडून विनंती…

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

यामुळे सर्वत्र रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. Raj Thackeray


याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.
माझी सर्वांना हातजोडून विनंती आहे. जिथे पूर आला आहे, जिथे घरात पाणी साचलंय, प्रत्येक घरात जा आणि मदत करा. पक्ष म्हणून मदत करु. पण तुम्हीही वैयक्तिक जाऊन लोकांना भेटा. त्यांना मदत करा, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.
