Pune : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने जीनजीवन विस्कळीत! खडकवासला धरण क्षेत्रात विक्रमी पावसाने पुण्यात पाणी शिरले, तिघे जण शॉक लागून मृत्यूमुखी..

Pune पुणे : पुणे जिल्ह्यात मागील बारा तासांपासून विक्रमी स्वरूपाचा मुसळधार पाऊस कोसळत असून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातील जीनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसरात नागरीवस्तीत पाणी शिरले असून खडकवासला धरणातून मुळा- मुठा नदीत ४० हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या असलेल्या या मुसळधार पावसाने धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी खडकवासला धरण प्रकल्पातून कालपासून टप्प्याटप्प्याने ४० हजार क्युसेसपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात मागील चोवीस तासांत ११८ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात १८३ मीलिमीटर , वरसगाव क्षेत्रात १८६ मीलिमीटर तर टेमघर धरण क्षेत्रात विक्रमी २१० मीलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण क्षेत्राची पाणीसाठा गुरुवारी (दि.२५) रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत ६९.५३% इतकी झाली आहे. धरण क्षेत्रात प्रचंड मुसळधार पाऊस पडत असल्याने मुठा कालवा व मुळामुठेत विसर्ग वाढविला आहे. Pune

पुढील काही तासांत पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रावरील खडकवासला धरण प्रकल्प , निरा देवधर प्रकल्पात वीर , गुंजवणी, निरा देवधर, भाटघर धरणाची पाणीसाठा ७५ %वर पोहचला आहे. त्यामुळे निरानदीत पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान पुण्यात भिडे पुलाजवळ अंडाभुर्जीची गाडी पुराच्या पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन परिसरातील काही सोसायट्यांत पाणी शिरले आहे. तर वडगावशेरीत वाहनांवर झाडे कोसळली आहेत. हवामान खात्याने सकाळी ११ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर दुपारी तीनपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.