Pune News : पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह!! मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने बस दामटवली, वाहनांना उडवत नागरिकांना चिरडलं…


Pune News : राज्यात अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्श कार हिट अँड रन अपघाताला जेमतेम महिना झाला आहे.

त्याचदरम्यान, ट्रॅफिक पोलिसाला धडक दिल्याची घटना उघडकीस आली होती. आता पुन्हा एकदा शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमक काय घडलंय?

कोथरूडमध्ये एका खाजगी बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि वाहनांना चिरडले, या विचित्र आपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एका तरुणाच्या गळ्यात दुचाकीचे स्टॅन्ड घुसल्याने तो गंभीररित्या जखमी आहे.

दरम्यान, यामध्ये दोन दुचाकी, एक रिक्षा, खासगी चारचाकी प्रवासी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!