Gold : बजेटनंतर सोने २ तासांत ३ हजारांनी स्वस्त, ग्राहकांना लॉटरी, खरेदीसाठी लोकांची गर्दी…

Gold : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे.

जळगावच्या आणि पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला. कारण, सोने खरेदीसाठी दुकाना गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना २ तासांतच प्रति तोळा सोन्यामागे २ हजार रुपयांचा फायदा झाला आहे.
त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं आहे. बजेट जाहीर होताच 3 हजारांनी सोन्याचा दर घटल्याचं रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी सांगितला. त्यामुळे, बजेटनंतर सोनं खरेदी करताना ग्राहकांची चांदी झाली आहे.

तारमण यांनी आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीम शल्क १५ टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. Gold

म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी झाली असून प्रतितोळा सोन्यामागे तब्बल २ हजार रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय नेमका बदल झाला?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क – ६ टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- ६.४ टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क ७ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे.