Pune Rain Update : पुण्यासह अनेक भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, काळजी घेण्याच्या प्रशासनाकडून सूचना..

Pune Rain Update : राज्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच आज राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज मुंबईसह पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


राज्याच्या अनेक भागात पावसामुळे अनेक भागात नद्या-नाले दुधडी भरून वाहत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Pune Rain Update
दरम्यान, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आणखी १-२ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
