हवेली तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…!   


उरुळी कांचन : हवेली तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे .हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर तसेच शिक्षक संघाचे नेते राजेश काळभोर यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील अनेक शिक्षक बांधवांनी उमेदवारीसाठी अर्ज भरले होते पण संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी अनेक शिक्षक बांधवांनी आपले अर्ज माघारी घेतली त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे-

गणेश जाधव,प्रकाश चौधरी, रोहिदास डिंबळे, प्रवीण झांबरे, विजय काळे, समीर काकडे, दिगंबर सुपेकर, संदीप गायकवाड, रंगनाथ ओताडे, बबन सातव, सोपान शेलार, मारुती हिंगणे,सुरेश कटके, वैशाली वाडकर, अश्विनी ठोंबरे यांची निवड झाली आहे.

या नवनिर्वाचीत संचालकांचा पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, जुनी पेन्शन हक्क योजनेचे जिल्हा अध्यक्ष, संतोष गदादे, माजी महिला राज्याध्यक्ष अनुराधा तकटे., हवेली महिला आघाडी अध्यक्षा सविता कळमकर,पुरंदर तालुका संघ अध्यक्ष, गणेश लवांडे, दौंड तालुका संघ अध्यक्ष रामभाऊ दोरगे, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख चिंतामण अद्वैत सर, महेंद्र मोरे सर, सचिन हंगरगे, सोमनाथ शिंदे, जितेंद्र कुंजीर,गोरख मेमाणे, संजय जगताप,नितीन मेमाणे, बाळासाहेब फडतरे, नंदकुमार शिंदे, यांसह संघाचे कार्यकारणीचे अनेक पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत मोहिते यांनी केले,तर सुत्रसंचलन दुर्गा देशपांडे यांनी केले.आभार सतीश चौधरी यांनी मानले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!