Ajit Pawar : मोठी बातमी! अजितदादा, फडणवीस हेलिकॅाप्टर प्रवासात थोडक्यात बचावले, पापायलटच्या कौशल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, दादा म्हणाले, माझ्या तर पोटात…


Ajit Pawar : गडचिरोलीतील एका कार्यक्रमासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज थोडक्यात बचावले आहे. अशी माहिती समोर आली आहे. पायलटच्या कौशल्यामुळे पायलट हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अजित पावर यांनी स्वतः याची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, हेलिकॉप्टर उंच ढगात गेले होते आणि तिथेच भरकटले. मात्र पायलटने कौशल्य दाखवत हेलिकॉप्टर चे लँडिंग व्यवस्थित केल्यामुळे बाहेर नेमकं काय घडलं ते कळलच नाही असेही अजित पवार म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले, जेव्हा हेलिकॉप्टर उंच ढगात गेले, तेव्हा अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांना तिकडे ढग दिसत असल्याने बाहेर जरा बघा, काही आहे असे सांगत होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवांत राहण्याचा सल्ला दिला. Ajit Pawar

माझे आतापर्यंत सहा अपघात झाले आहेत. मला काही झाले नाही. तुम्हाला काही होणार नाही निवांत रहा असे त्यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चार महत्त्वाचे नेते बसलेले होते. त्यामध्ये उदय सामंत देखील होते.

घटनेनंतर उदय सामंत यांनी अजित पवारांशी बोलताना दादा, जमीन दिसायला लागली, तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला, जरा बर वाटलं असे म्हणाल्याचा किस्सा अजित पवारांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात सांगितला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!