Baramati : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय! बारामतीत अनेक कार्यकर्ते गोविंदबागेत, नेमकं घडलं काय?


Baramati : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.

महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील शुक्लकाष्ठ कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. एकामागून एक धक्क्यांची मालिका सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकच खासदार निवडून आला. तर मोदी कॅबिनेटमध्ये पण त्यांना स्थान मिळाले नाही.

त्यांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात येणार होती. या ऑफरला पवार गटाने नकार दिला. विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांना आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. बारामतीतून नवीन चेहरा देण्याचे साकडे काही जणांनी शरद पवार यांना घातले आहे. Baramati

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहेत. शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या पवारांसमोर सध्याच्या राजकीय नेत्याविषयी खंत व्यक्त केली.

बारामतीत मध्ये विधानसभेला पवार विरुध्द पवार होणार नाही कारण अजित पवारांनी शब्द दिला होता की जर लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे.

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. युगेंद्र पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!