Shirur : शिरुर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजली, अमोल कोल्हेंनी अजितदादांना हिसकाच दाखवला, आढळराव पाटलांचा पराभव…

Shirur : शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. एकदाही शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाहीत. अखेर अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. Shirur
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता.
त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारलं होते.
अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.