मोठी बातमी! अहमदनगर मध्ये सुजय विखेंना बसणार पराभवाचा धक्का ! टीव्ही नाइनचा सर्व्हेचा अंदाज ..!!

Ahmednagar Lok Sabha Exit Poll देशात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली आहे. निवडणुका संपल्यानंतर देशात कोणाचे सरकार बनू शकते, असे अनेक संस्थांनी एक्झिट पोलमध्ये सांगितले. दरम्यान टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीने देखील एक्झिट पोल सादर केला आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे पिछाडीवर आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
TV9 मराठीने एक्झिट पोल सादर केला असून या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्त8वण्यात आलीये.