RTE : आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या अंतिम तारीख…


RTE : राज्याच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी येत्या ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना ४ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत पाल्याचा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे अर्थिक दुर्बल, वंचित, आर्थकि व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वयं अर्थसाहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महापालिका शाळांमध्ये (स्वयंअर्थसाहाय्यित शाळा) पहिली किंवा पूर्वप्राथमिक या स्तरावर २५ टक्के राखावी जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी या पूर्वी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. पाल्याचा आरटीई अर्ज भरण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. यंदा सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. RTE

प्रवेशासाठी सव्वादोन लाखांवर अर्ज : राज्यातील ९ हजार २१० इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १ लाख ५ हजार १६१ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळांची संख्या, उपलब्ध जागा आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देण्यात आली आहे.

त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सव्वासातपर्यंत २ लाख २७ हजार ४६७ विद्याथ्यार्ंचे अर्ज जमा झाले. पुण्यात सर्वाधिक १७ हजार ६८९ जागांसाठी ४५ हजार ७८९ पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!