ED raid : पैशांचा पाऊस!! मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरातून कोरोडो रुपये जप्त, रोकड बघून अधिकारीही हादरले…
ED raid : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्शभूमीवर झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने रांची, झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.
ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड २० ते ३० कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत.
ही रक्कम कोट्यावधीत असल्याचा अंदाज आहे. नोटा मोजण्यासाठी बँकचे कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठे घबाड ईडीच्या हाती लागल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
दोन वर्षांपूर्वी याच दिवशी आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि १७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती, हा योगायोग आहे. अंमलबजावणी संचालनालयाने रांची झारखंडमधील रांची येथे छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनी ही मोठी रक्कम जप्त केली आहे. ED raid
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड २० ते ३० कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत.
ईडीने रांचीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकत आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांच्या घरावरही ईडीची झडती सुरू होती. यावेळी अधिकाऱ्यांना जहांगीरच्या घरात ही रोकड सापडली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये प्रचार करत असताना त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी ही कारवाई झाली असून त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे.
आलमगीर आलम कोण आहे?
आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम २० ऑक्टोबर २०० ते १२ डिसेंबर २००९ पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते.
राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.