Yogi Adityanath : काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…!! सांगलीत योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य, चर्चा सुरू
Yogi Adityanath : लोकसभा निवडणुकीची सगळीकडे जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यामुळे कोण कुठे विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय पक्षांचे नेते रॅली आणि उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. यामध्ये बडे नेते मैदानात उतरले आहेत.
आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूरमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित रॅलींना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने देशात वाटोळं केलं आहे, असे ते म्हणाले.
सीएम योगी म्हणाले की, यूपीमध्ये 403 आमदारांच्या निवडणुका आहेत. मात्र जनतेने काँग्रेसला केवळ दोनच जागा दिल्या. अंत्यसंस्काराच्या वेळी रामाचे खरे नामस्मरण करण्यासाठी चार जणांची आवश्यकता असते. मात्र, तेथे काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या आहेत. Yogi Adityanath
पुढच्या वेळी तर त्यांना तेवढ्या पण जागा मिळणार नाहीत. काँग्रेसमध्ये अराजकता आहे. याशिवाय काँग्रेसवर हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून हिंदूंचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे वातावरण तापले आहे.
जात जनगणनेच्या नावाखाली काँग्रेस जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील योगी आदित्यनाथ म्हणाले. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला हद्दपार करा, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.