Crime News : दलाल महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय; पोलिसांची मारुंजीत कारवाई!


मारुंजी : एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅटमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथून समोर आली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दलाल महिलेला अटक केली. तसेच तिच्या ताब्यातील दोन महिलांची सुटका केली आहे. मारुंजी येथे सोमवारी (दि. १) सायंकाळी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅटमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या फ्लॅटवर छापा मारला. दलाल महिलेच्या ताब्यातून दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!