Vijay Shivtare : ब्रेकिंग! विजय शिवतारेंनी केली सर्वात मोठी घोषणा, अजित पवारांचे टेन्शन वाढणार?

Vijay Shivtare : अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र असल्याने शिवतारेंच्या भूमिकेवर वारंवार आक्षेप घेण्यात आला.
विधानसभेला अर्वाच्च भाषेत अजित पवारांनी टीका केल्याचा व पाडल्याचा राग मनात धरून असलेले शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेला पवार कुटुंबात एकटे पडलेल्या अजित दादांना खिंडीत गाठण्यासाठी कंबर कसली आहे.
आज ते बारामती लोकसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहेत. अशातच शिवतारेंनी पक्षविरोधी कृत्ये केल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा दबाव शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाढू लागला आहे. यावर शिवतारेंनी ‘माझ्यामुळे शिंदेंना त्रास, दोन ते तीन महिन्यांत बाहेर पडणार’ असे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Vijay Shivtare
दरम्यान, अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य करताना महायुतीत वातावरण बिघडायला नको म्हणून शांत असल्याचे म्हटले होते. यापूर्वी पवारांनी फडणवीस यांची भेट घेत बारामतीत शिवतारेंच्या बंडाची तक्रार केली होती. यानंतर शिंदे यांनी शिवतारेंना बोलावून समज दिली होती.
तरीही शिवतारे लोकसभा लढविण्यावर ठाम असून उघडपणे मोर्चेबांधणी, गाठीभेटी घेत आहेत. अखेर शिवतारेंवर कारवाई करण्याच्या सूचना शिवसेनेत आल्या असल्याचे वृत्त होते. अद्याप त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. यावर शिवतारेंनी एकनाथ शिंदे यांची माझ्यामुळे गेले दोन-चार महिने अडचण होत आहे. माझे आणि त्यांचे घनिष्ठ नाते आहे.
महायुतीत जागा सुटणार नाही, त्यांना अडचण आहे. मला लोकसभा लढवायची आहे. त्यांना अडचण आहे, म्हणून मी बाहेर पडतोय. आमची २५ वर्षांची सोबत आहे, ती असेलच. मी लोकसभेत विजयी होणार, असे शिवतारे यांनी सांगितले आहे.