शरद पवार, अजित पवार वादावर शरद पवार यांच्या बहिणीचे मोठे वक्तव्य!

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार यांच्या वादात पवार कुटुंबात अजित पवार एकटे पडले. त्यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पाटील यांनीही अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली. आता अजित पवार यांच्या आत्या आणि शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी या प्रकरणावर प्रथमच वक्तव्य केले आहे.

वादावर बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, निवडणुकीपर्यंत हे ढग आहे, निवडणूक संपली की हे ढग निघून जातील, असे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पवार कुटुंबामध्ये फूट नाही. निवडणूक होईल, जे निवडून येतील ते येतील. निवडणुका झाल्यावर सर्व संपेल. असं देखील त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ” आम्ही कधीच घरात राजकारण आणत नाही.

शरद पवार नेहमी स्वत:च्या ताटापेक्षा बहिणीच्या ताटात काय आहे,हे पाहत आले. यामुळे पवार कुटुंबात काहीच होणार नाही. असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.