आता कोणीही तुमच्या DP चा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही; व्हॉट्सॲपचं नवीन फीचर


WhatsApp New Feature : अनेकजण व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. सध्या व्हॉट्सअपने यूजर्ससाठी एक नवीन फीचर समोर आणलं आहे. ज्याच्या माध्यमातून वापरकर्त्याला कोणाच्याही व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. मेसेजिंग ॲपमध्ये प्रायव्हसी अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

जर कोणी आपल्या व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेत असेल तर तातडीने आपल्याला एक अलर्ट येईल. ही सुविधा मोबाईल फोन आणि डेस्कटॉप दोन्हीवर उपलब्ध असली तरी मेटा किंवा व्हॉट्सॲपने या अपडेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही.

पण या फिचरमुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मला व्हॉट्सॲप टक्कर देईल. जरी वापरकर्त्यानी डीपीचा स्क्रीनशॉट घेतला तर त्यांच्या फोनमध्ये ब्लॅक स्क्रीनचा स्क्रीनशॉट सेव्ह होईल.

दरम्यान, हे लक्षात घ्या की व्हॉट्सॲपचे हे अपडेट सर्व्हर साईटवर अपडेट आहे आणि ते टप्प्याटप्प्याने लोकांसाठी आणले जाईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सॲपचे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे हे फीचर बाय डीफॉल्ट अॅक्टिव्ह केलं असल्याने ते तुम्हाला डिलीट किंवा बंद करता येणार नाही. यूजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअपचं हे फीचर उत्तम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!