Accident News : आंबेगाव तालुक्यात मिनी बसचा भीषण अपघात; एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील वाळुंज वस्तीत रस्त्यातील पाईपलाईनच्या खड्ड्यामुळे मिनीबसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज बुधवार (ता. १३) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वच्छला किसन भोर (वय ६२) अशे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणराव आगाराची मिनीबस नारायणगावकडून शिंगवेकडे जात होती. मिनीबस भरधाव वेगाने असल्याने वाळुंज वस्ती येथे मिनीबसचा स्टेअरिंग रोड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यात असलेल्या पाईपलाईनच्या खड्ड्यात गेली. त्याचवेळी वच्छला किसन भोर या पंढरपुरला जाणासाठी निघाल्या होत्या. मिनीबसने त्यांना उडवले. यामध्ये त्या गाडी खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यानंतर रस्त्याच्या कडेला शेडमध्ये उभ्या असलेल्या दत्तात्रय गेनभाऊ वाळुंज यांच्या मालकीच्या क्रुझर या चारचाकीला जोरदार धडक देऊन शेडजवळ असलेल्या सखाराम बबन वाळुंज यांच्या घराला धडकली. यामध्ये चारचाकी व घराचे मोठे नुकसान झाले, तसेच मिनीबसमधील पाच-सहा प्रवासी जखमी झाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या भीषण अपघातात वच्छला यांचा मृत्यू झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.