गाडीचा आवाज करत असलेल्या गुंडाचा पोलिसांवर हल्ला, पोलिसांनीही दाखवला हिसका, पुण्यातील घटना…!


पुणे : खडकवासला- किरकटवाडी शिव रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे काल शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम होता. यावेळी पोलीस हवालदार विलास प्रधान आणि पोलीस नाईक राजेंद्र मुंढे हे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते.

यावेळी अचानक सराईत गुन्हेगार वैभव इक्कर हा जोरात मोटारसायकल वाजवत आला.तो जोरजोरात रेस करु लागल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने रस्त्यावरच गाडी टाकून दिली आणि, ‘मला ओळखलं का, वैभव इक्कर नाव हे आपलं, त्या नम साहेबाला विचार वैभव इक्कर कसा आहे.

माझी गाडी आहे मी काही पण करणार. इथंच पेटवून देणार, असे म्हणत शिवीगाळ केली. नंतर तो पोलीसांवरच हात उचलू लागला. संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर त्याची भर रस्त्यावर चांगलीच धुलाई केली.

त्याच्यावर खुन, दरोडा, मारहाण करुन दहशत निर्माण करणे व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!