मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन २५ वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल! आरोपी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात


लोणी काळभोर : पुण्यात नेमकं चाललं तरी काय? रोज कुठेना कुठे बलात्कार, खून, विनयभंग अश्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना विवाहितेच्या घरात घुसून मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातुन समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुरज हुलवान (पुर्ण नाव, वय, पत्ता माहीत नाही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय पीडितीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीता या कुटुंबासोबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहेत. पिडीत आणि आरोपी सुरज हुलवान हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीता यांचे पती काही दिवसांपूर्वी कामानिनित्त परराज्यात गेले होते.

तेव्हा पिडीता घरी एकट्या असल्याचा व ओळखीचा फायदा घेऊन आरोपी सुरज हुलवान हा पिडीतेच्या घरात घुसला. आणि पिडीता व त्यांच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने वारंवार शाररीक संबंध ठेवले.

दरम्यान, आरोपी सुरज हुलवान याच्याकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पीडितीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सुरज हुलवान याला त्वरित अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौगुले करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!