Vande Bharat : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार, कसा असेल मार्ग?, जाणून घ्या…
Vande Bharat : देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून सुरु आहेत. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे.
अशातच आता पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस सुटण्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. पुणे-बडोदा ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार आहे. पुणे शहरातून २ नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. नव्या रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.
येत्या १२ मार्च रोजी देशात दहा नवीन ‘वंदे भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये पुण्यातून धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.
पुणे-बडोदा आणि पुणे – सिकंदराबाद या नव्या २ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. येत्या १२ मार्च रोजी पुण्यासह देशाला नव्या १० वंदे भारत रेल्वे एक्स्प्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मेंटनेस सुविधा आणि ‘इलेक्ट्रिक पीटलाइन’ असणे आवश्यक आहे. घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्स येथे ही सर्व यंत्रणा तयार असून, त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. Vande Bharat
‘वंदे भारत’साठी फ्लॅटफॉर्मही उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे पुणे-बडोदा वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्यास कोणत्याच अडचणी नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ‘वंदे भारत’ फायद्याची ठरेल.
दरम्यान, देशभरातील धार्मिक स्थळांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केली जात आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर देशातून अनेक ठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. महाराष्ट्रात शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत.
आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत सुरु करण्याचा हालचाली सुरु आहेत. यामुळे संत गजानन महाराजांचे दर्शन घेणे मुंबई, पुण्यातील भाविकांना सोपे होणार आहे.