शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना सी. एस. आर. निधीतून शालेय साहित्यांचे वाटप..!

उरुळी कांचन : गावामध्ये संधी कमी असल्या तरी गावातील लोकांमध्ये जिद्द खूप असते. ग्रामीण भागांतील परिस्थिती आता सुधारत आहे आणि ते दिवस दूर नाहीत कि आपण अमरिका, रशिया सारख्या देशांशी तुलना करू शकू असे प्रतिपादन जोन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. कंपनीचेचे प्रकल्प वितरण संचालक संतोष जगताप यांनी केले.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयात जोन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शक्ती प्रकल्पांतर्गत आणि भारतीय बहुउद्देशिया खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाचे सुजान व जबाबदार नागरिक बनावे यासाठी या संस्थेच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संतोष जगताप बोलत होते.
यावेळी जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रकल्प वितरण संचालक संतोष जगताप, गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठानच्या संचालिका विद्या यादव, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मानव संसाधन प्रमुख प्रशांत मोहिते, प्रकल्प वितरण व्यवस्थापक कल्पना पाटील, मानव संसाधन व्यवस्थापक निखील मोहिते, प्रतिभा तरे, महादेव कोळे, अनिल पिंगळे, अस्मिता पाटील, नीता सरगर, माधव मोरे, गोपाळ कारंडे, शिवराज माने, मलतेश राव, कुबरसिंघ देऊरे, विशाल शाह, शशिकांत शिवणकर, सुनील वाघमारे तसेच भारतीय बहुउद्देशिया खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे, तांत्रिक अधिकारी दत्तात्रय लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रशांत मोहिते म्हणाले, “विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. संचालिका कल्पना पाटील म्हणाल्या मुलांनी लहान पणापासूनच आपले ध्येय निश्चित करावे भारतीय बहुउद्देशिया खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी त्यांचा सामाजिक क्षेत्राची माहिती दिली. तसेच यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.” शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.