Ganpat Gaikwad Case Update : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी आता पोलीसही आले अडचणीत, पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी, नेमकं कारण काय?
Ganpat Gaikwad Case Update : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकणी आता पोलिसांच्या देखील अडचणी देखील वाढल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कुठे कमी पडले? दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये कसे आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. Ganpat Gaikwad Case Update
अधिकाऱ्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज का घेता आला नाही? महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना तेथे पोलीस अधिकारी का नव्हते? पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फुटेज इतक्या तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचे कबूल केले आहे. तसेच याबाबत पश्चाताप नसल्याचेही म्हटलं आहे. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.