Amitesh Kumar : वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसवणारे अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या त्यांचा इतिहास…


Amitesh Kumar : वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसविणारे तसेच सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला आहे. हा पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पदभार स्विकारल्यानंतर लगेच ते हेल्मेट जनजागृती करताना दिसले.

अमितेश कुमार हे भारतीय सेवा पोलीस १९९५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.अमितेश कुमार हे २०२० ते २०२३ या कालावधीत नागपूरचे पोलीस आयुक्त होते. त्यांनी मॅच फिक्सिंगचा प्रकार उघडकीस आणला होता.

यात दाऊद इब्राहिम टोळीतील काही सऱ्हाईत सामील झाल्याचं लक्षात आल्यानंतर क्रिकेटच्या दुनियेत चांगलीच खळबळ उडाली होती. नागपूरमधील गुन्हेगारी थांबविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

पुण्यातील वाहतूक स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. पुण्यात वाहतूक सुधारण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न काही साध्य होताना दिसला नाही. अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली मात्र अजूनही साधारण ५० टक्के पुणेकर हेल्मेट वापरताना दिसत नाही. Amitesh Kumar

शिवाय पुण्यात अपघाताची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली मात्र ती यशस्वी होताना दिसली नाही. अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारतानाच थेट हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय यादव यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे.

राजेंद्र क्षीरसागर यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रविंद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!