दारु नशा भिंगली! मित्राचा निर्घून खून, पुण्यातील घटना..!!
पुणे : पुण्यातील कोंडावा परिसरातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीचा त्याच्या मित्रानेच निर्घृण पणे खून केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नसीम सइदुल्लाह खान (वय ३७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमल रोहित ध्रुव (वय १९ , रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे) त्याला अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नसीम आणि आरोपी कमल दोघेही कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंग करण्याचे काम करतात. एकाच खोलीत ते राहत असून मयत नसीम हा वयाने मोठा असल्याने कमल याला घरातील सगळी कामे सांगायचा. तसेच स्वयंपाक करायला लावायचा. काही कमी जास्त झाल्यास मारहाणही करायचा. मात्र कमलला नसीमचे वागणे सहन होत नव्हते त्यामुळे त्याच्या मनात राग होता.
मंगळवारी (ता.९) रात्री नेहमीप्रमाणे दोघात याच कारणावरून भांडण झाले असून नसीम याने दारूच्या नशेत कमलला शिवीगाळ केली. आणि घराबाहेर गेला. रागात असलेल्या कमलने त्याला जीवे मारण्याचे ठरवले. त्यानंतर तोही त्याचा पाठलाग करत घराबाहेर गेला. दारूच्या नशेत असलेल्या नसीमला त्याने मारहाण करत गळा आवळून खून केला. त्यानंतर कमल पुन्हा घरी येऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना नसीम याचा मृतदेह आढळला.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता कमल ध्रुव याची नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहे.