Shocking News : मॅगीसाठी केला आईकडे हट्ट, ती खाल्ल्यावर घडलं विपरीत, आईच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू..
Shocking News : एका मुलीने मॅगी नूडल्स खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रीवा येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
रिया साहू असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रिया साहू ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी ७ जानेवारीला संध्याकाळी शिकवणी संपवून घरी परतली. तिला भूक लागली म्हणून तिने आईसोबत मॅगी बनवली. रियाने मॅगी खाल्ल्यानंतर तिची तब्येत खराब झाली. Shocking News
तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने सेमरिया सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला रीवा येथे नेण्यास सांगितले. कुटुंबीय रियाला रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात नेत होते. मात्र, येथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार, रियाला मॅगी खूप आवडायची. घरी येऊन तिने आईला मॅगी खायची असल्याचे सांगितले. पण, तिच्या आईने सांगितले की, घरी जेवण तयार आहे, त्यामुळे तिने जेवण करावे.
पण, रियाने आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत मॅगी खाण्याचा हट्ट धरला. तिच्या सांगण्यावरून आई आणि मुलीने सोबत मिळून मॅगी बनवली. यानंतर रियाने मॅगी खाल्ली आणि तिची प्रकृती बिघडली.
पोलिसांनाही रियाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईक आणि इतर कुटुंबीयांचे जबाब घेतले. कागदोपत्री आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.