सोलापूर विभागाच्या दक्षिण, पश्चिम रेल्वे समस्यांचा रेल्वे राज्य मंत्र्यांनी घेतला आढावा, पुणे रेल्वे स्थानकाला भेट..!!


पुणे : माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री- भारत सरकार, रावसाहेब दानवे पाटील यांनी रविवार (ता. ७) रोजी पुणे स्टेशनला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचेशी सर्किट हाऊस – पुणे येथे बैठक घेतली. या प्रसंगी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थित होत्या.

डॉ. खाडे यांनी सांगली जिल्‍ह्यातील विविध रेल्वे प्रश्‍नांवर विशेषत: कृपामयी रेल्वे ओव्हर ब्रिज , मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्रमांक -१ आणि मिरज -अरग सेक्शन मधील रेल्वे फाटक क्रमांक -७० आणि हुबळी विभागातील विजयनगर स्‍टेशन यार्ड या ठिकाणी सामान्य जनांच्या सोयी-सुविधांबाबत चर्चा केली आहे.

तसेच डॉ.खाडे यांनी या बैठकीत सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली असून माननीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी डॉ. खाडे यांनाआश्वासन दिले की रेल्वे प्रशासन स्थानिक जनतेच्या सर्व समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीने पाहण्यास वचनबद्ध आहे. आणि राज्य सरकारशी सल्लामसलत/सहकार्य करून समस्यांचे शक्य तितके सर्वोत्कृष्ट निराकरण करेल.

दरम्यान, डॉ खाडे यांनी (ता. १०) जानेवारी २०२४ रोजी राज्य प्रशासन आणि पी डब्लूडी सोबत मिरजेतील कृपामयी ROB च्या संयुक्त भेटीसाठी पुणे विभागाला आश्वासन दिले. डॉ.खाडे यांनी रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांना सांगलीला भेट देऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास सांगितले. या बैठकीला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, मुख्य अभियंता (बांधकाम)श्री सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय इंजीनियर (समन्वय) श्री विजय कुमार राय व इतर शाखा अधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!