कुख्यात गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी मुख्य आरोपीला अटक , साथीदाराशी जमिनीचा वाद भोवला ..!!


Sharad Mohol । कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे शहर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. जमीनीच्या विवादातून मोहोळचा त्याच्या साथीदाराने तीन राऊंड फायर करुन खून केल्याचा निष्पन्न झाले आहे.

साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा फरार होण्याचा मार्गावर असताना शिरवळ येथून त्याचा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ३ पिस्टल देखील जप्त केले आहेत. ज्या पिस्टल मधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता ते पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबरोबर हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 

प्राथमिक माहितीनुसार, यातील आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते. याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी शरद मोहळ याला कोथरूडच्या सुतारदरा येथे तीन राऊंड फायर करुन मोहोळचा गेम केल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!