लहान बाळाचा कान, मुंडके रस्त्यावर आढळले, घटनेने बारामती हादरली..

बारामती : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान बाळाचा खून करून त्याचे मानेपासून खालील धड नसलेले व उजव्या बाजूचा कान तोडलेले मुंडके आढळून आल्याने बारामती हादरली आहे.

ही घटना बुधवारी (ता.३) रोजी सूर्यनगरी कॉम्पलेक्स समोर मूरमाच्या रस्त्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी पोलीस सहायक निरीक्षक अनिल ओमासे (वय,५३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारामती पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती सूर्यनगर येथील गणराज कॉम्पलेक्स समोरून पूर्वकडे जाणाऱ्या मुरुमाच्या कच्या रस्त्यावर अज्ञात आरोपीने अनोळखी लहान बाळाचा खून करून त्याचे मानेपासून खालील धड नसलेले व उजव्या बाजूचा कान तोडलेले मुंडके आढळून आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.