धक्कादायक ! चक्क कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका, बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ..


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेण्यात आल्या आहे. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे.

मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंधळ पुढे आला आहे. २०२३ चा हा पेपर २०१९ च्या सेट पेपरप्रमाणे असल्याचा धक्कादायक दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. म्हणजे २०१९ साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती तीच पुन्हा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता. २०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती. तेच पेपर २०२३ च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या सगळ्या प्रकारावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!