Ahmadnagar News : पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या पत्रानं उडाली खळबळ! प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या…


Ahmadnagar News : पोलीस दलात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या या पत्राने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या रामनाथ भाबड या हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे पोलिस कर्मचा-याने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल रामनाथ भाबड यांनी प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ११ डिसेंबरला प्रसारित झालेल्या यादीत पदोन्नती मार्कप्रमाणे आणि सिन्यॉरिटीप्रमाणे झाली नसल्याचा आरोप रामनाथ भाबड यांनी दिला आहे. Ahmadnagar News

पोलिस हेड कॉन्स्टेबलने लिहिलेल्या पत्रात म्हटले की, दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. पोलिस कर्मचा-याने हे पत्र पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे. पत्राचा फोटो आता व्हायरल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!