Gautami Patil : मराठा आरक्षाबाबत गौतमी पाटीलचे मोठे व्यक्तव्य, म्हणाली, ‘मलाही आरक्षण…

Gautami Patil : मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे काही कलाकार देखील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत.
अशातच नृत्यांगणा गौतमी पाटील हिने मराठा आरक्षाबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रा देण्याबाबतही गैतमीने भाष्य केले आहे. लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतमी पाटीलने मराठा आरक्षणावर मोठे व्यक्तव्य केलं आहे.
गौतमी पाटील म्हणाली, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज अनेकांना आरक्षण हवंय, त्यामुळे ते मिळालंच पाहिजे. मलाही आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय’. कोरोना काळात माझी परिस्थिती खूप हलाखीची झाली होती. हे क्षेत्र चालायला हवं. आता सगळं नीट सुरू आहे, असे गौतमी म्हणाली आहे. Gautami Patil
दरम्यान, गौतमीने यावेळी बोलताना राजकारणात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. ‘मी अजिबात राजकारणात जाणार नाही. नवा चित्रपट मिळाला तर करेन. चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही’. तसेच सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही, असेही गौतमीने स्पष्ट केले आहे.