BJP : सर्वात मोठी बातमी! भाजपच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे, कारण काय?

BJP : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये तीन राज्यात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या भाजपाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे.
बुधवारी (ता.६) जवळपास १२ खासदारांनी राजीनामे दिले आहेत. निवडणूक विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशामधील नरेंद्र सिंग तोमर, राकेश सिंग, उदय प्रताप, प्रल्हाद सिंह पटेल, रीती पाठक तर छत्तीसगडमधील अरुण सावो आणि गोमती साई त्याचबरोबर राजस्थानमधून राज्यवर्धन सिंग राठोड, दिया कुमारी आणि किरोदी लाल मीना हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्याचबरोबर बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांचाही राजीनामा दिला जाणार आहे. BJP
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला चांगलं यश मिळाल आहे. या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली आहे त्याचबरोबर तेलंगणामध्ये भाजपने कामगिरीत सुधारत आठ जागा जिंकल्या. भाजपने या चार राज्यांमध्ये २१ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते.
राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी सात खासदार निवडणुकीच्या आराखड्यात होते. तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलेंगणामध्ये तीन खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले होते.
विधानसभा निवडणूक लढवलेल्या आणि जिंकलेल्या भाजपच्या सर्व खासदारांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण १० खासदारांनी राजीनामे दिले आहेत. इतर दोन खासदार बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांचे राजीनामे बाकी आहेत.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींसोबत केले” असे ट्विट करत खासदारांच्या राजीनाम्याबाबत एका वृतसंस्थने माहिती दिली आहे.